Tuesday, December 11, 2012

Saturday, December 1, 2012

मरिलियर शॉट

दैनिक गांवकरी दि. २८ नोव्हेंबर २०१२.

Click the image to view it large.

शब्दकोशाबाहेरील क्रिकेटिंग शॉट्स

दैनिक गांवकरी २१ नोव्हेंबर २०१२.

क्रीडांगण.

Click to view it large

Friday, November 2, 2012

Thursday, September 6, 2012

Saturday, January 28, 2012

दक्षिणगंगेचे उगमस्थान: ब्रम्हगिरी

साप्तहिक सकाळ (दि.१७ डिसेंबर २०११) मध्ये ’भटकंती’ या सदराखाली प्रसिद्ध झालेला हा लेख.

दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला मिळते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान. येथील ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरीचे उगमस्थान आहे. सह्याद्रीच्या नयनरम्य पर्वतरांगांत त्र्यंबकेश्वर वसलेले आहे. या परिसराच्या चहूबाजूंनी ब्रम्हगिरीचा डोंगर आहे. या ठिकाणी दर वर्षी श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते. ब्रम्हगिरी पर्वतावर साधारणतः 4 ते 5 किलोमीटरवर गंगा-गोदावरीचे उगमस्थान आहे. त्र्यंबकेश्वर गावातून या पर्वताच्या पायथ्यापर्यंत सहज पोचता येते. त्याची रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. विशेषतः जून ते डिसेंबरदरम्यान हा परिसर घनदाट हिरवळीने नटलेला असतो. जणू काही निसर्गाने हिरव्या रंगाची सर्व उधळण याच परिसरात केली आहे. गोदावरीच्या उगमस्थानापर्यंत जाण्यासाठी एक संपूर्ण पर्वत पार करावा लागतो. चढाईच्या वाटेवर पायऱ्या असल्याने त्रास जाणवत नाही. अनेक ठिकाणी कोरून पायऱ्यांची रचना केली आहे. पावसाळ्यात धबधब्याचा आनंदही लुटता येतो; शिवाय संततधार असल्याने हा परिसर सतत धुक्‍याने वेढलेला असतो. येथून त्र्यंबकेश्वर शहराचे नयनरम्य दर्शन होते. प्राचीन काळी शंकराने जटा आपटून गोदावरीला जगाच्या कल्याणासाठी दिशा दिली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. तिथे एक मंदिर बांधण्यात आलेले आहे. शंकराच्या जटेच्या व गुडघ्यांच्या खुणा येथे पाहता येतात.
तुषार कुटे, नाशिक 
मूळ लेख इथे पाहता येईल.