Showing posts with label saptahik sakal. Show all posts
Showing posts with label saptahik sakal. Show all posts
Wednesday, September 18, 2013
Tuesday, June 4, 2013
Tuesday, February 21, 2012
Saturday, January 28, 2012
दक्षिणगंगेचे उगमस्थान: ब्रम्हगिरी
साप्तहिक सकाळ (दि.१७ डिसेंबर २०११) मध्ये ’भटकंती’ या सदराखाली प्रसिद्ध झालेला हा लेख.
दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला मिळते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान. येथील ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरीचे उगमस्थान आहे. सह्याद्रीच्या नयनरम्य पर्वतरांगांत त्र्यंबकेश्वर वसलेले आहे. या परिसराच्या चहूबाजूंनी ब्रम्हगिरीचा डोंगर आहे. या ठिकाणी दर वर्षी श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते. ब्रम्हगिरी पर्वतावर साधारणतः 4 ते 5 किलोमीटरवर गंगा-गोदावरीचे उगमस्थान आहे. त्र्यंबकेश्वर गावातून या पर्वताच्या पायथ्यापर्यंत सहज पोचता येते. त्याची रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. विशेषतः जून ते डिसेंबरदरम्यान हा परिसर घनदाट हिरवळीने नटलेला असतो. जणू काही निसर्गाने हिरव्या रंगाची सर्व उधळण याच परिसरात केली आहे. गोदावरीच्या उगमस्थानापर्यंत जाण्यासाठी एक संपूर्ण पर्वत पार करावा लागतो. चढाईच्या वाटेवर पायऱ्या असल्याने त्रास जाणवत नाही. अनेक ठिकाणी कोरून पायऱ्यांची रचना केली आहे. पावसाळ्यात धबधब्याचा आनंदही लुटता येतो; शिवाय संततधार असल्याने हा परिसर सतत धुक्याने वेढलेला असतो. येथून त्र्यंबकेश्वर शहराचे नयनरम्य दर्शन होते. प्राचीन काळी शंकराने जटा आपटून गोदावरीला जगाच्या कल्याणासाठी दिशा दिली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. तिथे एक मंदिर बांधण्यात आलेले आहे. शंकराच्या जटेच्या व गुडघ्यांच्या खुणा येथे पाहता येतात.

तुषार कुटे, नाशिक
मूळ लेख इथे पाहता येईल.
Labels:
bramhagiri,
marathi,
saptahik sakal,
treking,
tushar kute,
ब्रह्मगि्री,
मराठी लेख,
साप्ताहिक सकाळ
Friday, July 22, 2011
तोरणा गड (साप्ताहिक सकाळ दि. २३ जून २०११)
तोरणा गड
- तुषार कुटे, नाशिक
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेला हा किल्ला पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. महाराजांनी या गडाला प्रचंडगड असे नाव दिले होते. त्यामुळे हा किल्ला किती मोठा असेल याची कल्पना येते. पुणे जिल्ह्यातील सर्वांत उंच गड म्हणून तोरणा नावाजलेला आहे. पुण्यापासून 42 किलोमीटर अंतरावर वेल्हे गावात व याच तालुक्यात हा किल्ला आहे. सिंहगड रस्ता संपल्यावर सिंहगडच्या पायथ्याशी उजव्या बाजूला एक खानापूरकडे जाणारा रस्ता लागतो. त्या रस्त्याने वेल्हे गावाकडे जाता येते. हा रस्ता पुढे राजगडाला जाऊन मिळतो. सिंहगडापासून तोरणा किल्ला 22 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याला लागणाऱ्या बावे या गावापासून डावीकडे राजगडला तीन कि.मी. तर उजवीकडे पाच कि.मी. तोरणा किल्ला आहे. गाडी केवळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतच जाऊ शकते. स्वतःची गाडी असेल, तर उत्तम. पावसाळ्यात तोरणा किल्ला पाहण्याची मजा काही औरच. पावसाळी वातावरणात पायथ्यापासून बुरूज दिसणे अवघड असते. किल्ल्याचा बुरूज पूर्णपणे धुक्याने वेढलेला असतो. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंच हा गड आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगराची चढाई फारशी कठीण नाही. खरा कस लागतो, तो मूळ किल्ला चढण्यातच. उंचावरून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना सामोरे जाताना दमछाक होते. मूळ किल्लाही चढाईला थोडा अवघड आहे. पावसाळ्यात घसरणीचा त्रास होऊ शकतो. तोरणा किल्ल्यावर पोचण्यास दोन तास लागतात. पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर हिरवागार झालेला असतो. त्यामुळे अधिक प्रसन्न वाटते. किल्ल्यावरील तोरणजाई मंदिर, मेंगाई मंदिर, बुधलामाची, झुंजारमाची ही ठिकाणे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
- तुषार कुटे, नाशिक
मूळ लेख इथेही पाहता येईल.
Subscribe to:
Posts (Atom)