Saturday, June 5, 2010

लेख: दै. गावकरी दि. ४ जुन २०१०

लोकसत्ता हास्यरंग दि. ४ ऑगस्ट २००३

स्वर्गामध्ये प्रत्येकाच्या पापाचे घड्याळ लावलेले असते. प्रत्येकाच्या पापवृद्धीप्रमाणे घड्याळाचे काटे फिरत राहतात.
एकदा परवेझ मुशर्रफ यांच्या बेगमला स्वर्गात जाण्याची वेळ आली. तिथे त्यांना सर्वांच्या पापांची घड्याळे लावलेली दिसली. महात्मा गांधी तसेच मदर तेरेसा या सर्वांचीच घड्याळेही तेथे लावली होती. बेगमला आपले घड्याळ पाहायला मिळाले. त्याचा काटाही खूप पुढे गेला होता. शेवटी त्यांना आपले पती परवेझ मुशर्रफ यांचे घड्याळ पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. पण त्यांचे घड्याळ कोठे दिसेना. न राहवून त्यांनी चित्रगुप्तला विचारले,
‘‘आमच्या ह्यांचे घड्याळ कुठे आहे ?‘‘
‘‘ह्यांचे म्हणजे कुणाचे ?‘‘
‘‘परवेझ मुशर्रफ यांचे...‘‘
‘‘हो! ते होय. ते तर इंद्राच्या दरबारात फॅन म्हणून लावले आहे.‘‘
तुषार भगवान कुटे, जुन्नर, जि. पुणे

मूळ लेखन...

Tuesday, May 11, 2010

लोकसत्ता हास्यरंग ५ ऑक्टोबर २००३

ममताला जाणवलं की तिचा पती तिच्यावर आता तितकं प्रेम करत नाही, जेवढं लग्नानंतरच्या दिवसात करत होता. एक दिवस जेवताना तिने प्रेमाने म्हटलं, ‘‘अहो, आता तुमच्या वागण्यात पहिल्यापेक्षा किती बदल झाला आहे. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ताटातील भाजी माझ्या ताटात वाढत होतात. आता असं का करत नाहीत ? काय मी आता सुंदर दिसत नाही ?‘‘ यावर पतीने तिला सांगितलं, ‘‘नाही प्रिये, असं नाही. खरं म्हणजे आता तुला भाज्या बनवता येऊ लागल्या आहेत.‘‘

तुषार भगवान कुटे, पिंपरी पेंढार

Tuesday, April 20, 2010

लोकसत्ता हास्यरंग: सप्टेंबर २००६

दैनिक लोकसत्ताच्या हास्यरंग पुरवणीमध्ये मी पाठविलेले दोन विनोद प्रसिद्ध झाले होते. मी नियमित लोकसत्ता घेत नसल्याने मला ते प्रसिद्ध झाल्याची माहितीच नव्हती. परंतु, सहज लोकसत्ता ऑनलाईन चाळत असताना मला मी लिहिलेले दोन्ही विनोद दृष्टीस पडले. लोकसत्ताच्या सप्टेंबर २००६ च्या अंकामध्ये ते प्रसिद्ध झाले होते....

लोकसत्ताच्या http://www.loksatta.com/old/daily/20060903/hs10.htm या पानावरही ते पाहता येतील.

पती ः तुझ्या वडिलांची चेष्टा करण्याची सवय अजून गेली नाही वाटतं?
पत्नी ः का? एवढी काय चेष्टा केली तुमची?
पती ः आता फोनवर त्यांनी मला विचारले, माझ्या मुलीशी लग्न करून तू खूश आहेस ना?

भिकारी ः माई, पोटासाठी काही खायला द्या.
माई ः एका दिवसाची शिळी भाकरी चालेल?
भिकारी ः हो.
माई ः मग उद्या ये!
- तुषार कुटे, पिंपरी पेंढार